Thursday 1 December 2016

ताडोबा - एक अविस्मरणीय अनुभव - नोव्हेंबर २०१६ - कॅम्प २७ - (लेखक - रिद्धी कुलकर्णी)

ताडोबा - नोव्हेंबर १८ ते २०, २०१६


यावर्षी आम्ही iCampers  बरोबर ताडोबाला गेलो होतो. आमच्यापैकी बऱ्याच जणांची ही पहिलीच जंगल ट्रिप होती. ट्रिपचे प्लांनिंग देखील खूप आधीपासून सुरु होते. सर्वांच्याच मनात वाघ दिसेल कि नाही याची उत्सुकता होती. ठरल्याप्रमाणें आम्ही गुरुवारी रात्री दुरोन्तो एक्सप्रेसने मुंबईहून निघालो. टीम पुणे आम्हाला थेट नागपूरलाच भेटणार होती. अठरा जणांचा मोठा ग्रुप मुंबईहून होता. गाडीमध्ये धमाल करत आम्ही सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूरला पोचलो. छान थंडी पडली होती. केदारकाकाने सांगितलेल्या  तीन Innova तयारच होत्या. उमरेड गावाजवळ एका धाब्यावर ब्रेकफास्ट करून आम्ही ताडोबाच्या दिशेने रवाना झालो. ताडोबाचे "छावा Resort" अतिशय छान होते. फ्रेश होऊन, लंच नंतर आम्ही आमच्या फर्स्ट ride साठी निघालो.  

आता थोडं ताडोबाच्या जंगलाबद्ल:
ताडोबाचे जंगल खूप मोठे आहे. एकूण ६५० किलोमीटरचा परिसर आहे. जंगलाला एकूण सात गेट्स आहेत. त्यापैकी कोलारा, पांगडी, नवेगाव, मोहर्ली, नवेगाव, झरी आणि खुतवंडा या गेट्सने जंगलात जाता येते. जंगलात एकूण साठ वाघ आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आहेत.

दिवस पहिला - फर्स्ट Ride

आमची first ride दुपारी कोलारा गेटने होती. Ride च्या सुरवातीलाच हरणांचा (Spotted Dear) कळप दिसला. पुढे गेल्यावर आमची नजर एका "Signature स्पायडर" वर गेली. त्या "Signature" केलेल्या जाळ्याचे भरपूर फोटो काढून आम्ही पुढे निघालो. 









वाघाच्या शोधात फिरत असताना खूप पक्षी पहायला मिळाले. पांढरपौनी या वाघांसाठी प्रसिद्ध भागात वाघ न दिसल्याने सर्वजण थोडे निराश झाले. पण त्याची उणीव वेगवेगळे पक्षी व फुलपाखरे भरून काढत होती. मग आम्ही ताडोबा तळ्याकाठी आलो. हे तळे या जंगलातील सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे. उन्हाळ्यातसुद्धा इथे पाणी असते. या तळ्यात मगरींचा (Crocodile) सुळसुळाट आहे. नशिबाने आम्हाला एक मगरीचे पिल्लू दिसले देखील. 











इथून पुढे गेल्यावर रानगव्यांचे (Bison) कळप चरत होते. संध्याकाळच्या सूर्यकिरणात जंगलाचे सुंदर दृश्य दिसत होते.  या ride चा highlight शेवटी आला - अस्वल. एक नाही तर चांगली दोन. अस्वलाची मादी आणि एक पिल्लू मस्त खेळत होते. या दुर्मिळ दर्शन असणाऱ्या प्राण्याचे दर्शन झाल्याच्या आनंदात आम्ही रिसॉर्टवर परत आलो.



दिवस दुसरा: सेकण्ड Ride

दुसऱ्या दिवशीच्या आमच्या गेट entries वेगवेगळ्या गेटमधून होत्या. आम्ही पहाटे पांगडी गेटमधून आत गेलो. जंगलाच्या या भागाला "कोळसा Range" म्हणतात. जंगलात सगळीकडे दव पडले होते. थंडीही चांगलीच होती. फिरत फिरत आम्ही झरी गावाच्या परिसरात आलो. अचानक आमच्या गाईडला दूरच्या गवतात काहीतरी हलताना दिसले. हाच तो क्षण होता ज्याची आम्ही पाहत वाट होतो. एक वाघिण गवतातून शांतपणे चालत येत होती.  ती आमच्या गाडीसमोर आली. आमचे कॅमेरे सतत क्लिक होत होते. तिचे वर्णन फक्त "रुबाबदार" याच शब्दाने होऊ शकते. 




















गाईडने वाघिणीचे नाव "शिवांझरी " असे सांगितले. तिचे एक पिल्लूदेखील जवळच होते. आम्हाला मनसोक्त फोटो काढून दिल्यानंतर शिवांझरी परत झाडीत निघून गेली. परत येतांना हरीण व रानगवा दिसले. We were filling "on Top of the world".

दिवस दुसरा: थर्ड ride

संध्याकाळी परत पांगडी गेटचीच एन्ट्री होती. आत्तासुद्धा आम्ही परत शिवांझरीला शोधायचा प्रयत्न केला पण no luck. आता आमच्या गाईडने गाडी घनदाट जंगलात नेली. जंगलातली शांतता आमच्या शहरी गोंधळाला सरावलेल्या कानांना हवीहवीशी वाटत होती. आत्तासुद्धा अनेक पक्षी दिसले.                                






थंडीचा कडाका अनुभवत आम्ही परत रिसॉर्टला आलो. गरमागरम चहा आणि भजी वाटच पाहत होती! रात्री जेवण झाल्यावर आम्ही कोलारा गेटपर्यन्त चालत गेलो. कुठलेही प्रदूषण नसल्याने आकाशातील तारे सुंदर दिसत होते. या walking ride ला धमाल आली.


दिवस तिसरा: लास्ट Ride

तिसऱ्या दिवशीसुद्धा  आम्ही पांगडी गेटने आत गेलो. दोन ग्रुपच्या entries कोलारा गेटने तर केदारकाकाची entry नवेगाव गेटने होती. पांगडीला यावेळी आम्हाला फक्त पक्षीच दिसले. पहाटेचे दव पानांवर चमकत होते. या ride मध्ये आम्हाला मोर खूप जवळून दिसले आणि मुंगूसाची जोडी देखील.










Jungle Cat


Sambar Deer

Grey Headed Fish Eagle

Wild Hare

Morning Glory

Crested Hawk Eagle

 परत झरी गावाजवळ वाघ दिसेल या आशेने तिथे बराच वेळ थांबलो पण आज नशीब नव्हते. वेळ संपल्यावर आम्ही रिसॉर्टला परत आलो.


हा आमचा पहिलाच जंगलाचा अनुभव होता. It was really exciting and thrilling. अतिशय सुंदर आठवणी मनात साठवत परतीचा प्रवास सुरु केला तो परत इथे किंवा दुसऱ्या जंगलात जायचेच असा निश्चय करूनच.

And last not but least, thanks a lot Kedarkaka for making this happen for us!





रिद्धी कुलकर्णी